अवधूतवाडी पोलीस स्टेशनला गेल्या सहा महिन्यापूर्वीच रुजू झालेले एपीआय मनोज पवार यांना पदोन्नती देण्यात आली असून ते आता नागपूर शहर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक या पदावर रुजू होणार आहेत. त्यांची पदोन्नती झाल्याचा आदेश प्राप्त होताच अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये सर्वांनी समाधान व्यक्त करत त्यांच्या अभिनंदन केले.