कुसुंबा गावात चंद्रशेखर पाटील यांच्या घरावर दगडफेक करून गोळीबार केल्याच्या गंभीर घटनेतील पाच संशयित आरोपींना अटक केल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी त्यांची धिंड काढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये अटक केलेल्या आरोपींना सुप्रीम कॉलनी परिसरातून फिरवण्यात आले.