आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी शासन कटिबद्ध असून जनआरोग्य व आयुष्यमान भारत योजनेंतर्गत नागरिकांना विनामूल्य उपचार सुविधा उपलब्ध आहेत. अंगीकृत रुग्णालयांची देयके नियमित अदा केली जातील, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता दिली. हॉटेल आर.एस. येथे झालेल्या वैद्यकीय व्यावसायिक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. महात्मा ज्योतिबा फुले योजनेत रुग्णालयांची देयके दर महिन्याला अदा करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी