पोलीस ठाणे कोंढाळी हद्दीतील विकास नगर येथे राहणारे मख्खन सिंग रणजीतसिंग बावरी वय तीस वर्ष यांचा रक्ताने माखलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांच्या पत्नीने कोंढाळी पोलिस ठाण्यात बेपत्ता पत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती. मखन सिंग यांची पत्नी लक्ष्मी कौर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, 30 जुलै रोजी मख्खन सिंग सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास औषध घ्यायला जातो असे सांगून दुचाकीवरून बाहेर पडले. ते रात्री आठ वाजेपर्यंत घरी आले नाही.