लोणीकंद येथील नाईकवडे डेअरी समोर पायी जात असताना तरुणाच्या हातातील मोबाईल चोरून नेणाऱ्या अल्पवयीन मुलासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, लोणीकंद येथील सुधीर पाटील हे रात्री १० च्या सुमारास पायी घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्यांनी हातातील मोबाईल हिसकावून नेला होता. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी दीपक रामबग बंशकार, मयुरेश संतोष बांगरे (दोघेही रा. सणसवाडी) यांना अटक केली आहे तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.