एटापल्ली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत एका दारू तस्कराला रंगेहाथ पकडले आहे. आरोपीकडून २८ पेट्या देशी दारू, एक पेटी विदेशी दारू आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेला ट्रॅक्टर असा एकूण ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रात्री मुसळधार पाऊस सुरू असताना करण्यात आली.