पुणे मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणामध्ये कोरेगाव तालुक्यातील गोडसेवाडी येथे सुरु असलेल्या रेल्वे पुलाच्या कामाची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी शनिवारी दुपारी चार वाजता ग्रामस्थांनी शेतकऱ्यांचे समवेत पाहणी केली. यावेळी मध्य रेल्वेचा स्थापत्य आणि उभारणी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी त्यांनी केली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार दर्जेदार आणि वेळेत काम करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.