मुंबई मध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे.त्यामुळे मुंबईच्या जवळ असलेले तालुक्यातील सकल मराठा समाज यांच्याकडून न्याहारीची सोय करण्याचे नियोजन केले आहे.कर्जत या मुंबईच्या जवळ असलेल्या सकल मराठा समाजाने चटणी भाकरी यांची मोठी जबाबदारी उचलली आहे.आज शनिवारी सायंकाळी कर्जत येथून चटणी भाकरी घेऊन पाच वाजता मराठा आंदोलक मुंबईकडे निघाले आहेत.