लातूर-महाराष्ट्र नवनिर्माण सेना लातूर शहरच्या वतीने आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा लातूर येथील रामकृष्ण मंगल कार्यालय, लातूर येथे उत्साहात पार पडला.लातूर शहराध्यक्ष मनोज अभंगे, दत्ता म्हेत्रे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत सहभागी भगिनींमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्यांना पैठणी व रोख रक्कम अशी आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली.