लोहा तालुक्यातील मौजे वाका शिवार येथे दि ३१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास यातील मयत नामे साहेबराव शंकर यन्नमवाड वय २४ वर्षे हे बैलांना पाणी पाजविण्यासाठी नदी पात्रात गेले असता पाय घसरून पाण्यात पडुन नदी पात्रात बुडून मरण पावले. याप्रकरणी खबर देणार माधव यन्नमवाड यांनी दिलेल्या खबरीवरून आज दुपारी उस्माननगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झालेली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चिंचोर हे आज करीत आहेत.