आज रविवार दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान हदगाव तालुक्यातील मौजे भानेगाव येथे सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी उपोषणकर्ते ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सिंगनवाड यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की,भानेगावातील शाळेत गत चार महिन्यांपासून मुख्याध्यापक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या व इतर मागणीसाठी ग्रामस्थांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असुन प्रशासनाकडून अद्याप कुठलीच दखल घेतली नसल्याचे म्हटले आहे.