Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 21, 2025
आज गुरुवार 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्हा प्रशासनाच्या वतीने माहिती देण्यात आली की, नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून जायकवाडी धरणाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, या अनुषंगाने जायकवाडी धरणाचे 17 दिवसात दुसऱ्यांदा 18 दरवाजे उघडण्यात आले आहे, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीने सदरील गोदावरी काठावरील गावांवर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.