पारोळा ---- जळगाव जिल्ह्यासह पारोळा एरंडोल भडगाव पाचोरा चाळीसगाव आदी तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाचे नोंद झालेली असून. शेतकरी वर्गाच्या अतोनात प्रचंड असे नुकसान झालेले आहे,हाता तोंडाशी आलेला घास, अवकाळी अतिवृष्टी पावसाने हिरावून घेतलेला असून, शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी झालेली आहे. जिल्ह्यात सततचा पावसाने थैमान घातले असून परतीच्या पावसाने सीमा ओलांडलेली आहे शेतकऱ्यांमध्ये असंतोष व भय निर्माण झाले आहे.