लातूर -मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनात लातूर जिल्ह्यातील आंदोलकांनी अनोखा पायंडा पाडला. सीएसटी परिसरात व आझाद मैदानाजवळ लातूरच्या आंदोलनकर्त्यांनी आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता रस्त्यावर थेट कबड्डी खेळत आपली भूमिका ठामपणे मांडली. या अभिनव उपक्रमाने मुंबईकरांचे आणि प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतले.