लग्नाचे आमिष दाखवून आणि कपडे घालतानाचे फोटो वायरल करेन अशी धमकी देत सांगाव येथील युवतीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी पीडित युवतीने शिरोळ पोलिस ठाण्यात भूषण चोकाककर याच्या विरोधात दि.26 ऑगस्ट 2025 रोजी गुन्हा दाखल केलेला आहे.संशयित आरोपी आणि त्याचे वडील यांचेकडून धमकी आणि दबाव टाकत मानसिक त्रास देत आहेत.15 दिवस झाले तरी अद्याप ही संशयित आरोपीवर कारवाई नाही त्यांच्या कारवाई करून न्याय मिळावा अशा मागणीचे निवेदन पीडित युवतीने कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.