सेनगांव तालुक्यातील शिवनी खुर्द या ठिकाणी गणेशोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी शिवनी खुर्द येथील शिवस्वराज्य गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिराला गावकऱ्यांनी देखील आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला तसेच तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये भव्य असे हे रक्तदान शिबिर संपन्न होत आहे.