महंमदपूर येथे राहणार दिनेश देवतळे यांच्या घराची भिंत पडल्याने नुकसान झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे महंमदपूर येथे राहणार दिनेश देवतळे यांच्या घराची भिंत कुटुंबातील सर्व सदस्य झोपले असताना पडली. सुदैवाने कुटुंबातील झोपलेल्या सदस्यांना कुठलीही हानी झाली नसून भिंतीच्या मळ्याच्या खाली काही घरातील वस्तू दबल्यामुळे काही प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.