शाळा आहे पण शिक्षक कोठे आहे? शिक्षक द्या आम्हाला शिकायचे आहे. असा नारा देत बेलगाव तालुका मेहकर येथील जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आणि पालक चार सप्टेंबर रोजी थेट पंचायत समिती कार्यालयात घुसले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी तातडीने शिक्षकांची नियुक्ती व्हावी यासाठी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयात शाळा भरवली.