पातूरच्या खडकेश्वर गणेश मंडळाचा समाजाभिमुख उपक्रम अकोल्याच्या पातूर येथील खडकेश्वर गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवाला सामाजिक भानाची जोड देत वेगळी ओळख निर्माण केली आहे. यावर्षी त्यांनी आदिवासी घराचे देखावे साकारून पुरातन भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले. जुन्या शेती अवजारांपासून गणेश मूर्ती साकारण्यात आली असून, वारली चित्रकलेने सजलेली झोपडीही लक्षवेधी ठरली आहे. मंडळाने नवीन पिढीला संस्कृतीची जाणीव व्हावी यासाठी प्रदर्शनही भरवले. सलग दोन वर्षे राज्यस्तरीय उत्कृष्ट मंडळाचा पुरस्कार पटकावणाऱ्या