मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आणि राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे आवश्यक होते, तसे सरकारने केले नाही. वेळोवेळी वेळकाढू पणा केला. विरोधी पक्ष यामध्ये काय करू शकत नाही. सरकारनेच काही ती भूमिका घ्यावी, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात आमदार शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी पावणे सहा वाजता ते बोलत होते.