शहरातील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन रेल्वे स्थानक चौकातील खड्डा अपघाताचे कारण ठरू नये म्हणून वाहतूक शाखेचे हवालदार उज्वल डहाळे व पोलिस अंमलदार रमेश गंगलवाड यांनी स्वतः पुढाकार घेऊन मुरूम व माती टाकून खड्डा बुजविला. या कौतुकास्पद कृतीबद्दल सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या पुढाकाराने त्यांचा सत्कार १ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता गांधी रोड येथे कर्तव्यावर असतानाच करण्यात आला. या वेळी महेंद्र भोजने, उल्हास सरदार, शिलवंत वानखडे, सिद्धार्थ वाहुरवाघ आदी मान्यवर उपस्थित होते. पोल