शहरातील बस स्थानकावर 21 ऑगस्ट रोजी 61 वर्षीय महिलेच्या हातातील 25 ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी लंपास करणाऱ्या संशयीतास पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सूनवली आहे.शुभम दशरथ सूर्यवंशी वय 27 रा.अंबरनाथ जी.ठाणे असे न्यायालयाने कोठडी सूनावलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याने शहर बसस्थानकावर 61 वर्षीय महिलेच्या हातातील 25 ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी चोरण्याचा प्रयत्नात त्यास महिलेने पकडले होते.त्याचेवर गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले होते.