पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना फरासखाना पोलिसांनी शिताफीने अटक केली. ७ सप्टेंबर रोजी पहाटे बेलबाग चौक परिसरात भाविकांचे मोबाईल चोरीस गेले होते. तपास पथकाने गुप्त बातमीदाराच्या मदतीने मालेगाव, नाशिक येथील अलीम मुस्ताक शेख (२६) व अत्तर अहमद एजाज अहमद (२५) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून १३ महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांची एकू