आडगाव भागातील लाखलगाव उड्डाणपूल जवळ मोटरसायकल घसरल्याने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून आडगाव पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सचिन तानाजी कडाळे राहणार लाखलगाव हा युवक मोटरसायकलने सय्यद पिंपरी कडून लाखलगाव कडे येत असताना रेल्वे उड्डाण पुलाजवळ मोटरसायकल घसरल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.औषध उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर शिंदे यांनी तपासून मयत घोषित केले.