धरणगाव ते चोपडा हा अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्याचे सुरू असलेल्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले होते. या गंभीर प्रकरणाची दखल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कामाची चौकशी होणार असे आदेश काढणार असल्याची प्रतिक्रीया रविवारी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पाळधी येथील निवासस्थानी दिली आहे.