माणगाव तालुक्यातील इंदापूर येथे शनिवारी (ता. 5) मध्यरात्री एकच्या सुमारास एका इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या तीन दुकानांना (कटलरी, मेडिकल व स्वीट मार्ट) अचानक आग लागली. शनिवारी (ता. 6) पहाटे पावणे पाच वाजता या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मध्यरात्र असल्याने या ठिकाणी कोणी नव्हते. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली मात्र दुकानांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आगीचे व धुराचे लोळ सर्वत्र मोठ्या प्रमाणात पसरले होते. ही घटना लक्षात येताच स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.