शेजाऱ्यांकडे घराची चावी विश्वासाने ठेवण्याकरिता दिली असता दोन महिलांनी संगनमत करून महिलेच्या घरातील सुमारे चार तोळ्यांचे दागिने चोरून नेल्याची घटना अंबड येथे घडली.फिर्यादी कीर्ती सुनील काजळे आणि आरोपी मनीषा प्रशांत माळी व लता जाधव या तीनही महिला एकाच सोसायटीमध्ये राहतात. काजळे यांनी राहत्या घराची चावी विश्वासाने ठेवण्याकरिता दिली होती.फिर्यादी यांच्याशेजारी राहणारी मनीषा माळी व तिची नणंद लता जाधव यांनी संगनमत करून फिर्यादीच्या राहत्या घरात प्रवेश करून चोरी केली