घुग्घूस शहरातील गांधी चौकात महाविकास आघाडीच्या वतीने आज दि 10 सप्टेंबर 12 वाजता गांधी चौकात जनविरोधी जन सुरक्षा विधेयक रद्द करण्याबाबत काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल नरुले, शहर अध्यक्ष राजुरेड्डी, शिवसेना(उबाठा ) शहर प्रमुख बंटी घोरपडे, ज्येष्ठ नेते गणेश शेंडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहर अध्यक्ष शरद कुमार ज्येष्ठ नेते सत्यनारायण डकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधातील बॅनर फलक घेऊन महायुती सरकार भाजपा सरकार मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध आंदोलन करण्यात आले.