एरंडोल तालुक्यात गांधीपुरा आहे. या गांधीपुरा येथील रहिवाशी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी अल्पवयीन मुलीचा सर्वत्र शोध घेतला.मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.