यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपरी येथे 25 ऑगस्ट रोजी चार जणांनी संगणमत करून ग्रामसभेत गोंधळ घालून उपसरपंच यांचे तोंडाला ऑइल लावून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे. सदर घटने संदर्भात रमेश मुंडवाईक यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी चौघांवर वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.