शिवणी पारधी बेड्यावर वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने धडक वॉशआऊट मोहिम:१८ लाख २९ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला.प्राप्त माहितीनुसार वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला शिवणी पारधी बेड्यावर अवैध गावठी दारुची मोठ्या प्रमाणात गाळपान होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पथकाने याठिकाणी जाऊन वॉशआऊट मोहिम राबली असता याठिकाणी जमीन गाडून असलेल्या 123 प्लास्टीक व लोखंडी ड्रममध्ये 16,450 ली. मोहा सडवा रसायण व 270 ली. गावठी मोहा दारू व इतर भट्टी साहित्य नष्ट केले.