दिग्रस शहरातील विराटनगर व कर्णेश्वरनगर भागातील पाच घरे चोरट्यांनी कुलूप कोंडा तोडून एकाच रात्री फोडली. चोरट्याने घरातून २३ हजार ५०० रुपये चोरून नेल्याची घटना दि. २५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली. घटनेची माहिती मिळतास दिग्रस पोलिसानी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी दि. २६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान फिर्यादी विनाश राठोड रा. विराटनगर यांच्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला.