कृषी संस्कृतीतील महत्वाचा सण म्हणून ओळखला जाणारा पोळा सण आज राज्यभर हर्षोल्हासात साजरा होत आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलजोडींच्या कष्टांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून व सजवलेल्या बैलांना मानाच्या तोरणाखाली नेऊन त्यांचा सन्मान केला जातो.