चिखलदरा तालुक्यातील बेला येथील युवकाने अल्पवयीन युवतीला दिनांक २१ रोजी सायं ५ वाजता फुस लावून पळवून नेले याबाबत मुलीच्या वडिलांनी चिखलदरा पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.४७ वर्षीय फिर्यादी यांची १६ वर्षाची मुलगी ही वर्ग ११वी मध्ये शीक्षण घेत असून ती वस्तगुहात राहते, नमूद तारखेला फिर्यादी यांनी मुलीच्या मैत्रीच्या मोबाईल फोन लावून मुलीबाबत विचारले मात्र तिच्या मैत्रिणीने हॉस्टेल मध्ये नाही असे सांगितले. फिर्यादी यांनी नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती दिसून आली नाही