अंजनगाव सुर्जी येथील शहानूर नदीच्या पात्रात एका युवकाचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मृतदेहाची अवस्था भीषण असल्याने पाहणाऱ्यांची गर्दी झाली होती.मिळालेल्या माहितीनुसार,मृत युवक गेल्या ३ दिवसांपासून घरून बेपत्ता होता.नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला,मात्र तो मिळून आला नव्हता.आज सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास नदी पात्रात त्याचा मृतदेह तरंगताना स्थानिकांच्या लक्षात आला.त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.संदीप आकारामजी ओळंबे असे मृतक युवकाचे नाव आहे .