महिला सरपंचास तिघांनी वाद घालून मारहाण करून धमकी दिल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजे दरम्यान लोणी गुरव येथे उघडकीस आली आहे.याबाबत लोणी गुरव येथील सरपंच अंबिका दिलीप भगत (५५) यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, घरी असतांना गणेश संतोष मोरे, ऋषीकेश संतोष मोरे दोघे रा.लोणी गुरव व मंगेश विजय कदम रा. केळवद ता. चिखली हे घरी आले. गणेश मोरे याने आपल्या गावातील पांडेबुवा तुमच्यामुळे गावात येत नाही. त्यामुळे गावाचे काही काम होत नाही, असे म्हणुन काठीने मारहाण केली.