पुणे शहर :हडपसर येथील मॅरीगोल्ड सोसायटीसमोर, अहिल्यादेवी होळकर चौकाजवळ रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय नागे अभिजीत गणेश रेवले (रा. फुरसुंगी) याचा जागीच मृत्यू झाला. अनोळखी डंपर चालकाने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून, भरधाव वेगात बेदरकारपणे वाहन चालवत अभिजीतच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अभिजीतचा मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर डंपर चालक अपघाताची खबर न देता पसार झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा द