ठाणे शहरातील विवियाना मॉल परिसरामध्ये पूर्व द्रुतगती महामार्गावर सातत्याने अपघात घडत आहेत. अंधारामुळे दुभाजक नीट दिसत नाहीत आणि गाड्या दुभाजकाला धडकतात आणि अपघात होतात, अशीच एक अपघाताची घटना रात्री उशिरा अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान घडली. गाडी दुभाजकाला धडकल्याने भीषण अपघात झाला यामध्ये एक जरी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच कारचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.