33 केव्हि उच्च दाब वाहिनीवर देखभाल दुरुस्तीचे काम पालघर येथून करण्यात येणार आहे. यामुळे या उच्चदाब वाहिनीवरून वीजपुरवठा होणाऱ्या सफाळे व आसपासच्या परिसरातील वीजपुरवठा शुक्रवारी सकाळी 11 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव सफाळे, पारगाव, नवघर, आगरवाडी, केळवा, रामबाग, एडवण या परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार आहे.