पोलीस स्टेशन अरोली अंतर्गत येत असलेल्या अडेगाव फाटक शिवारात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून 12 जुगाऱ्यास ताब्यात घेऊन 6 लाख 27 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना घडली. याबाबतचे वृत्त असे की अरोली पोलिसांचे पथक गस्तीवर असतांना गुप्त माहितीच्या आधारे अडेगाव फाटक शिवारात जुगार अड्ड्यावर धाड टाकून 12 आरोपीस ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास अरोली पोलीस करीत आहेत.