लोणी स्टेशन चौकात समोरासमोर आले. कार्यकर्ते एकमेकांना हातवारे करून आव्हान देत होते. कार्यकर्ते आक्रमक झाले होते तर दोन्ही मंडळांनी डीजेच्या आवाजाची मर्यादा ओलांडली होती. टसल लागुन वाद कधीही होऊन प्रकरण कधीही चिघळू शकत होते अखेर लोणी काळभोर पोलिस घटना स्थळी त्वरीत आले. या चौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला. पोलीस प्रशासनाने डॉट बारा वाजता डीजे बंद केला. आणि संपूर्ण गणेश विसर्जन सोहळा पोलिस प्रशासनाच्या उपस्थित यशस्वीरीत्या पार पाडला.