28 सप्टेंबर रोजी भारत-पाक फायनल सामना सुरू असताना ठाण्यामध्ये चांगलाच राडा झालेला पाहायला मिळाला. भारत-पाक सामन्याच्या ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आला होता. ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांनी रात्री उशिरा हॉटेलमध्ये भारत पाकिस्तान मॅच सुरू असताना आक्रमक भूमिका घेतली आणि घोडबंदर रोड परिसरातील ब्रह्मांड नाका येथील हिल टॉप हॉटेल बार आणि कॅलिफोर्निया हॉटेल बार येथे धडक देऊन हॉटेलमधील टीव्ही फोडले आणि आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.