केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती गावपातळीवर पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात 'पंधरवड्या'चे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्यात स्वच्छता अभियान, ‘एक पेड माँ के नाम’ ही योजना, घरकुल योजना आणि इतर महत्त्वाच्या योजनांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे. शिवाय येत्या डिसेंबरमध्ये खासदार खेल महोत्सवाचे आयोजनही करण्यात आली असून त्यासाठी आढावा बैठकीही घेण्यात आली अशी माहिती, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मंगळवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दिली.