विदर्भ राज्य आंदोलन समिती अंजनगावच्या वतीने आज दुपारी १ वाजता तहसील कार्यालयासमोर नागपूर कराराची होळी करण्यात आली.२८ सप्टेंबर १९५३ हा विदर्भासाठी काळा दिवस मानला जातो.त्या दिवशी विदर्भ जनतेला गप्प करण्यासाठी नागपूर करार करण्यात आला होता.या करारानुसार विदर्भाला सर्व क्षेत्रात २३ टक्के वाटा देण्याचे लिखित आश्वासन देण्यात आले होते. मात्र,महाराष्ट्रातील सत्ताकांक्षी व स्वार्थी नेत्यांनी या कराराचे पालन कधीच केले नाही,उलट या कराराला केराची टोपली दाखवून विदर्भावर सतत अन्याय करण्यात आला.