“राज्य शासन जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचा दर्जा उंचावून त्यांना स्मार्ट शाळांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत असून खाजगी शाळेपेक्षा सरकारी अनुदानित शाळा अत्यंत दर्जेदार व्हाव्यात, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.शासकीय शाळांचा दर्जा उंचावून स्मार्ट शाळा करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात सहपालकमंत्री ॲड. आशिष जसस्वाल यांनी सांगितले.