बागलाण तालुक्यातील ठेकेदारांचे पंचायत समितीच्या आवारात आंदोलन Anc: कामांची देयके, विना दंड मुदतवाढ व अन्य मागण्यांबाबत तालुक्यातील ठेकेदारांनी एकत्र येत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता गावित व शाखा अभियंता राकेश आहिरे यांना आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास निवेदन दिले आहे. यावेळी ठेकेदारही आक्रमक झाल्याचे दिसुन आले. तालुक्यात जल जीवन योजने अंतर्गत ११२ योजनांचे काम सुरु करण्यात आले होते यातील बहुतांश योजना पूर्णत्वाकडे गेल्या आहेत.