Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 26, 2025
आज मंगळवार 26 ऑगस्ट रोजी सिडको एमआयडीसी पोलिसांनी माहिती दिली की, 25 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता फिर्यादी अतुल अमोल ढासलेकर राहणार सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर यांनी तक्रार दिली की, 25 ऑगस्ट रोजी रात्री अडीच वाजता फिर्यादी यांचा भाचा प्रणव सचिन उपाध्ये याला अज्ञात वाहनाने धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे, याप्रकरणी अज्ञात वाहनधारका विरोधात सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल मेने हे पुढील तपास करीत आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली.