उदगीर शहरात सध्या गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून शहरातील विविध भागात अनेक गणेश मंडळांनी विविध प्रकारचे देखावे साकारले आहेत, देखावे पाहण्यासाठी भावीक भक्तांनी गर्दी केली असून,उदगीर व जळकोट मतदार संघाचे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी शहरातील सर्वच गणेश मंडळांना भेटी देत असून आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली, इंद्रा नगर भागात मंदिर बांधकामाला १५ लाखांचा निधी दिला,निधी कमी पडला असेल तर आणखीन निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन आमदारांनी नागरिकांना दिले