सिमेंटने भरलेले ट्रॅक्टर चढावावरून जात असतांना ताबा सुटून ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरचालकाचा दबुन दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अनुराग स्टेट बँक कॉलनी येथे घडली आहे. यावेळी नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केली होती. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश मोरसिंग चव्हाण (वय ४७, रा. भैरव नगर, पिंप्राळा हुडको, जळगाव) असे मयत झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.