आज २३ ऑगस्ट शनिवार रोजी सायंकाळी ६ वाजता मिळालेल्या माहितीनुसार येत्या काळातील सार्वजनिक गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणाहून मिळण्यासाठी एक खिडकी प्रणाली राबविण्यात येणार आहे. तसेच पोलिसांच्या परवानगीसाठी संबंधित पोलीस निरीक्षक निर्णय घेणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लागणाऱ्या सर्व परवानग्या आणि इतर अनुषंगिक बाबीबाबत बैठक घेण्यात आली...